Yakub Memon Grave | याकूबच्या कबरीवरुन राजकारण करणाऱ्या भाजपला आदित्य ठाकरेंनी थेटच विचारलं | Sakal

2022-09-08 82

Yakub Memon Grave : दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवरुन आरोप करणाऱ्या भाजपला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ओसामा बिन लादेनला समुद्रात दफन केलं तसं याकूब मेमनला समुद्रात दफन का नाही केलं? दफन झालं तेव्हा सरकार कोणाचं होतं? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित करत आरोप करताना सत्य परिस्थिती काय हे पाहणं गरजेचं आहे अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी फटकारलं.